शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१२

शिवराज्याभिषेक

marathahand
तक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केली. जडित सिंहासन सिद्धं केले, रायरीचे नाव ‘रायगड’ म्हणून ठेविले. तक्तास स्थळ तोच गड नेमीला. गडावरी तक्ती बसवावे असे केले. सप्तमहानदियांची उदके व थोर थोर नदियांची उदके व समुद्राची उदके, तीर्थक्षेत्रे नामांकित तेथील तीर्थोदके आणिली. सुवर्णाचे कलश केले व सुवर्णाचे तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजियांस अभिषेक करावा असा निश्चय करून, सुदिन पाहून मुहूर्त पाहिला. ‘शालीवाहन शके १५९६, ज्येष्ठ मासी शुद्ध १३स मुहूर्त पाहिला.’
        साडेचार् हजार राजांना निमंत्रणे गेली. रायगडावर साडेचार हजार राजे जमले. गागाभट्टानि पवित्र साप्तनद्यांचे पाणी आणले. राजे ब्रम्हा मुहूर्तावर उठले, स्नान केले, शिवाई मातेला अभिषेक केला आणि जिजाऊ मातांचे दर्शन घेतले. कवड्यांच्या माळा घातल्या, जिरेटोप डोक्यावर घातला, भवानी तलवार कंबरेला जोडली आणि राजे गड फिरू लागले.
        राजे सभागृहात आल्याबरोबर साडेचार हजार राजांनी मानवंदना दिली, बत्तीस मणांचे सिंहासन वर ठेवलेले होते त्याला तीन पायर्या होत्या. पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यावर राजांचे हृदय हेलावले, राजांच्या डोळ्यात अश्रू भरून आले आणि चटकन आठवण आली " राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये , शिवा न्हावी कितीही जन्माला येतील शिवा काशीद जन्माला येतील परंतु रयतेचा राजा, शिवाजी राजा पुन्हा जन्माला येणे नाही राजे". राजांच्या डाव्या डोळ्यातून अश्रू गळाले. 

शिलालेख


राजांनी दुसर्या पायरीवर पाय ठेवला आणि आठवण आली " राजे तुम्ही सुखरूपविशालगडावर जावा आणि पाच तोफांची सलामी द्यावी. जोपर्यंत हे कान पाच तोफांची सलामी ऐकत नाही न राजे तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे देह ठेवणार नाही राजे." राजांच्या उजव्या डोळ्यातून अश्रू गळाला .
        तिसर्या पायरीवर पाऊल ठेवल्याबरोबर आठवण आली "राजे आधी लगीनकोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाच. जगून वाचून आलोना राजे तर लेकराच लग्न करीन नाहीतर माय बाप समजून तुम्हीच लग्न लावून टाका. " राजे धळाधळा रडू लागले.
        साडेचार हजार राजांना कळेना काय झाले. आज आनंदाचा दिवस, अनाथ झालेल्या हिंदुना बाप भेटणार, मराठी मातीला नवरा भेटणार , शिवाजी राजा होणार आणि राजांच्या डोळ्यातून अश्रू ... तोच तिथे उभ्या असलेल्या एका वडीलधार्या व्यक्तीला राजांनी आवाज दिला. मदारी काका जवळ आले आणि विचारले राजा आज आनंदाचा दिवस आणि तू रडतोस. त्यावर राजे म्हणाले काका ज्यांच्यामुळे माळा सिंहासन मिळाले तेच पाहायला राहिले नाहीत. कोणत्या तोंडाने या सिंहासनावर बसू काका. हे सिंहासन टोचेल मला. यातून उतराई होण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. या गेलेल्यांचे पाईक म्हणून तुम्ही काहीतरी मागा. मदारी काकांनी सांगितले " राजा अरे ते गेले तरी त्यांनी काही मागितले नाही, माझ्यासारख्याने काय मागावे ? " राजे म्हणाले काहीतरी मागा काका म्हणजे मला उतराई होता येईल. यावर मदारी काका म्हणतात " हे असेच म्हणतो ना शिवबा तर एकच दे, या बत्तीस मणांच्या सिंहासनाची चादर बदलण्याचे काम राजे या गरिबाला दे मला दुसरे काही नको."

  • कृष्णाजी अनंत सभासद विरचित ‘शिवछत्रपतिंचे चरित्र.’ (छत्रपति शिवरायांचा प्रथम चरित्रकार) कलम ८७, राज्याभिषेक : त्याऊपर वेदमूर्ती गागाभट वाराणीसकर येऊन रायेगडी (रायगडावर) याहेस्वामीस (शिवाजी महाराजांस) मुंजी बंधन (मुंजकरून) पटाभेषक सिंहासनारूढ झाले. शके १५९६ आनंदनाम संवछरे (संवत्सर) चैत्र सुध (शुद्धं) प्रतिपदा शुक्रवार.
  • मंत्री दत्तजी त्रिमल वाकेनिविस विरचित ’९१ कलमी बखर’‘शाके षण्णव बाण भूमि गणानादानंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त किर्ती महिते शुक्लेष सार्पे तिर्थो’।
  • रायगड निर्मिती समयी (राज्याभिषेकाचे वेळी) श्री शिवरायांच्या आज्ञेने रायगडावरील जगदीश्वराच्या प्रासादात लावलेल्या शिलालेखातील उल्लेख. अर्थ. असा, ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ गणल्या जाणार्याड अशा ‘शालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ शुद्धं त्रयोदशी’ या शुभदिनी शिवरायांना राज्याभिषेक झाला. जेस्ष्ट श्रुध (शुद्धं) १२ श्रुक्रवार (शुक्रवार) घटी २१ पले ३४ वी ३८/४० सी ४२ तीन घटिका रात्रं उरली तेव्हा राजश्री सिवाजी राजे भोसले सिंव्हासनी बैसले. छ १० रबिलवल सु॥ खमस सबैन अलफ.- जेधे शकावली.
        श्री शिवचरित्र सांगणारी वरील सर्व अस्सल साधने आणि रायगड निर्मितीचा भक्कम पुरावा असणारा श्री शिवाजी महाराजांच्या आज्ञेने/अनुमतीने हिरोजीने जगदीश्वर प्रासादात लावलेला शिलालेख ह्या सर्वांतून हे निश्चित होते की, छत्रपति शिवाजी महाराजांना तिथीनुसार राजाभिषेक झाला.



छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्र्वर गड


 वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले. पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात लढत एक एक प्रदेश जिंकला. केवळ ५० वर्षांच्या कालावधीत विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना पाणी पाजले. खिस्ताब्द १६७४ मध्ये त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि हिंदु धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले.
         छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाग्यविधाते म्हणून स्वराज्याची जनता त्यांना पाहू लागली. काही जण, तर त्यांना हिंदूपती पातशहा म्हणू लागले. शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे रक्षण केले आणि जीभेवर रामनाम राखून धरले. सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली.
 
हिंदवी स्वराज्याचा साक्षीदार
रायरेश्वरसह्याद्रीच्या कडेकपारी, शिवमंदिर एक । तिथे रायरेश्वर स्वयंभू शिवलिंग सुरेख ।।
आणाभाका झाल्या आमुच्या, त्याच्या साक्षीने ।
एकजुटीने राहून कोणा अंतर न देणे ।।
देशासाठी, धर्मासाठी झोकून देऊ उडी ।
मावळे आम्ही शिवबाचे सवंगडी ।।


         सृष्टीच्या नानाविध रूपांचे प्रत्यंतर देणारा निसर्गरम्य रायरेश्वरगड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. तो समुद्रसपाटीपासून ४६९४ फूट उंचावर वसला आहे. येथून वैराटागड, केंजळगड, पांडवगड, कमळगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोळेश्वर, रायगड, लिंगाणा, तिकोणा, राजगडतोरणासिंहगड, पुरंदर, वज्रगड,प्रतापगड, चंद्रगड इ. गड दिसतात. रायरेश्वर पठाराची लांबी ११.०४ कि.मी. असून, रुंदी १.०२ कि.मी. आहे. गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेले शिवमंदिर आणि जननी देवीचे मंदिर आहे. छ. शिवाजी महाराजांनी शिवा जंगम नावाचा पुजारी तेथे पूजेसाठी नेमला होता. सध्या येथे जंगम लोकांची ४० कुटुंबे रहातात.
          सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छ. शिवाजी महाराजांनी २६ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. सिंहाची छाती असणार्‍या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची आण घेतली.

बुधवार, १२ डिसेंबर, २०१२

शिवाजी महाराज यांनी १६४६ मध्ये लिहिलेले पहिले मूळ पत्र सापडले!

शिवापूरजवळील रांजे गावच्या पाटलांनी एका महिलेशी गैरवर्तन केले होते. न्यायनिवाडा करण्यामध्ये अतिशय परखड आणि स्पष्ट भूमिका घेणा-या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी स्त्रियांशी गैरवर्तन करणा-या गावाच्या पाटलाला थेट हातपाय तोडण्याची शिक्षा सुनावली होती... हा प्रसंग सविस्तर सांगणारे शिवाजी महाराजांचे सर्वांत जुने आणि अस्सल पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाचे अभ्यासक अजित पटवर्धन आणि डॉ. अनुराधा कुलकर्णी यांना मिळाले आहे. पत्राच्या तारखेचे इसवी सनातील रूपांतर २८ जानेवारी १६४६ असे , असून त्यावर तत्कालीन मुद्रांनी शिक्कामोर्तबही करण्यात आले आहे.

हे पत्र पाहण्याची संधी जानेवारी महिन्यात इतिहासप्रेमींना मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द , त्यांची न्यायनिवाडा करण्याची पद्धती यावर तज्ज्ञांकडून अखंड संशोधन सुरू असून इतिहासाची पाने उलगडताना अनेक नवनवीन दस्तऐवज पुढे येत आहेत. पटवर्धन आणि कुलकर्णी या अभ्यासकांना सापडलेले हे पत्र मुळात मंडळातील संशोधक स. ग. जोशी यांना ८३ वर्षांपू
र्वी म्हणजे १९२९ मध्ये मिळाले होते. पुढे १९३० साली मंडळाने शिवचरित्र-साहित्य खंड दोन या पुस्तकात ते प्रकाशित केले ; मात्र , त्यानंतर दीर्घ काळ या पत्राचा ठावठिकाणा ज्ञात नव्हता. मात्र या दोघांना मंडळाच्या दप्तरखान्यातच अभ्यास करताना नुकतेच हे पत्र मिळाले असून ते जुनारी कागदावर लिहिलेले आहे. पत्र अत्यंत जीर्ण झाले असून त्यातील ७५ टक्के मजकूर वाचता येतो आहे , अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री. मा. भावे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराजांच्या पत्राचा मराठी अनुवाद
राजश्री शिवाजी राजे यांच्या कचेरीतून खेडेबारे तर्फेचे कारकून, देशमुख व देशकुलकर्णी यांना शुहूर सन १०४६
जाणावे की- सदर तर्फेतील रांजे या गावचा मोकदम बावाजी भिकाजी गुजर हा सदर गावाची मोकदमी करीत असताना त्याच्याकडून काही बदअमल झाला. ही गोष्ट साहेबांना (म्हणजे शिवाजी महाराजांना) विदीत झाली. त्यावरून साहेबांनी हुकूम करून त्याला पकडून आणविले तेव्हा चौकशी केल्यावर ती गोष्ट खरी असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर बावाजी याची वंशपरंपरा मोकदमी सरकारात जप्त केली आणि बावाजीचे हातपाय तोडून त्याला मोकदमीवरून काढून टाकले. त्या वेळी सोनजी बजाजी गुजर हे त्या गोतातील म्हणून त्यांनी विनंती केली की बावाजीस माझ्या हाती द्यावे. ती विनंती विचारात घेऊन बावाजीला तीनशे पादशाही होन दंड ठोठावला. ते सोनजी याने देऊन बावाजीस हाती घेतले. बावाजीस संतान नाही आणि सोनजी हा गुजर कुळातील आहे म्हणून साहेबांनी मेहेरबान होऊन सदर तर्फेतील रांजे गावची मोकदमी सोनजी बजाजी गुजर याच्या हवाली करून त्याच्याकडून सरकारात दोनशे पादशाही होन शुल्क घेऊन त्याला मोकदमी दिली आहे. त्याला कोणी अडथळा करू नये. हे मूळ पत्र भोगवटय़ाकरिता त्याला परत द्यावे. आक्षेप घेऊ नये. सुरनिसांनी रुजू केले.