मराठी सिनेमाला लोकाश्रय नसल्याची चर्चा होतअसतानाच , वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या 'बीपी ' तथा बालक - पालक या सिनेमाने दहादिवसांतच तब्बल तीन कोटींचा पल्ला पार केला आहे. अजूनही या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळतोय .प्रेक्षकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन अनेक थिएटर्स ,मल्टिप्लेक्सवाल्यांनी ' बीपी ' च्या शोजची संख्याहीवाढवली आहे . आत्तापर्यंत सर्वाधिक कलेक्शनकरणाऱ्या ' शिवाजीराजे ...' ला ' बीपी ' बॉक्सऑफिसवरकशी टक्कर देतोय याची उत्सुकता प्रेक्षकांना लागूनराहिली आहे .
पौगंडावस्थेत असलेल्या मुलांची गोष्ट सांगणारा ' बीपी ' हा सिनेमा ४ जानेवारीला प्रदर्शित झाला .प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाची खूप चर्चा होती . त्यामुळे रिलीजनंतरही ' बीपी ' ला रसिकांचा तुफानप्रतिसाद मिळू लागला . एक - दोन आठवड्यातच थिएटर्समधून गाशा गुंडाळणारे मराठी सिनेमेपहायला मिळत असतानाच अनेक थिएटर्समध्ये या सिनेमाने हाऊसफुल्लचा बोर्ड लावला आहे . दहादिवस होऊनही याला मिळणारा प्रतिसाद वाढतोच आहे . या सिनेमाने दहा दिवसांतच तीन कोटी पारकेले आहेत . याबाबत बोलताना सिनेमाचा निर्माता उत्तुंग ठाकूर म्हणाला , ' सिनेमाला मिळालेलाप्रतिसाद अप्रतिम आहे . विषय आणि त्याची मांडणी यांचंच ते यश आहे . म्हणूनच हा सिनेमाप्रदर्शित करताना आम्ही आधी १६० थिएटर्समध्ये ३५० शो लावले होते . पण , याला मिळणाराप्रतिसाद लक्षात घेऊन ही संख्या ४०० वर गेली आहे . याचा फायदा बॉक्स ऑफिसवर झाला असून ,सिनेमाने आजवर तीन कोटी कमावले आहेत .'
' सिनेमा बनवतानाच त्याचं बजेट कमी असावं याकडे आम्ही लक्ष दिलं होतं . कारण , सिनेमाच्यातिकिटबारीची शाश्वती नव्हती . म्हणूनच केवळ दीड कोटीत आम्ही पूर्ण सिनेमा बनवला ,' अशीमाहितीही त्याने दिली . तीन कोटी पार करणारा नव्या वर्षातला हा पहिलाच सिनेमा ठरला आहे .
1.No. putchar
उत्तर द्याहटवा