शुक्रवार, १८ जानेवारी, २०१३

विवेकानंद आणि शिवाजी महाराज


विवेकानंद आणि शिवाजी महाराज
100 वर्षांपूर्वीची घटना आहे. मद्रासच्या (आत्ताचे चेन्नई) समुद्रकिना?र्‍यावरील एका घराच्या गच्चीवर रात्रीच्या नीरव शांततेत चांदण्या रात्री एका युवा संन्याशाच्या गीताचे स्वर घुमताहेत..

'जैसे अरण्यास दावानल, हरीण कळपास चित्ता

भव्य गजास वनराज, घोर तमास सूर्य अन्

कंसास र्शीकृष्ण असे, तैसे म्लेंच्छांच्या रानटी

टोळ्यांस राजा शिवछत्रपती !'

'स्वामीजी, काय हे? आपण मुक्तकंठाने स्तुतिसुमने उधळीत आहात.' स्वामीजी काही बोलणार त्याआधीच तो शिष्य स्वामीजींना विचारू लागला, 'स्वामीजी, आपल्यासारखी आध्यात्मिक व्यक्ती हिंसाचार करणार्‍याची स्तुती करू शकते? की ज्याने जमावाच्या मनात प्रक्षोभ निर्माण करून लुटालूट आणि सर्व प्रकारच्या अत्याचाराचे नेतृत्व केले.'
स्वामीजी तत्काळ थांबले, तीव्र संतापाने त्यांच्या चेहरा लालबुंद झाला. ते गरजले, 'मला तुम्हा लोकांची लाज वाटते! भारतवर्षाच्या एका महापुरुषाबद्दल, धर्मात्म्याबद्दल असे अशोभनीय शब्द तुमच्या ओठावर येतातच कसे?

जेव्हा आपला धर्म आणि संस्कृती विनाशाच्या उंबरठय़ावर जाऊन पोहोचली होती, जेव्हा संपूर्ण समाजाचे घोर अध:पतन होऊन मातृभूमीच्या गौरवाची मानखंडना होत होती, अशा वेळी समाजाला वाचवण्याचे, मातृभूमीला गौरव प्रदान करण्याचे कार्य ज्या वीर पुरुषाने केले; त्याच्याविरुद्ध असे खुळचट आणि वृथा आरोप करण्याचे धाडस कसे करता? ज्यांना भारताबद्दल काही देणे-घेणे नव्हते, ज्यांना भारतीय संस्कृती व परंपरा याबद्दल आस्था नव्हती आणि भारताला गुलामीत ठेवणे हेच ज्यांचे ध्येय होते अशा धूर्त, कावेबाज परकीयांनी लिहिलेला इतिहास वाचल्याचाच हा परिणाम आहे. तुम्ही लोक तो विकृत इतिहास घोकून बरळत आहात.'

'सत्य तर हे आहे की भारतातील सारे जन, ऋषी-मुनी परकीयांच्या जोखडातून, दास्यातून मुक्ती मिळवून देणा?र्‍या महापुरुषांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होते. अशा मोक्याच्या वेळी छत्रपती शिवरायांनी परकीय दास्यातून मुक्त करून धर्माची पुनर्संस्थापना केली. असा राजा, कणखर नेता, महात्मा कोठे झाला आहे काय? छत्रपती शिवराय म्हणजे राष्ट्राच्या आत्मशक्तीचे तेजस्वी प्रगटीकरण होते. भविष्यातील उज्‍जवल भारताच्या भवितव्याची मशाल पेटविणारा असा हा राजा..' स्वामीजी भारावून सांगतच होते. स्वामीजींचा शिष्य स्वत:च्या अज्ञानाने लज्जित झाला होता. तो स्वामीजींना अत्यंत क्षीण आवाजात विनंती करू लागला, 'स्वामीजी! कृपया आमच्या गैरसमजुती दूर करून मार्गदर्शन करा.'
मध्यरात्री उशिरापर्यंत स्वामीजी आपल्या ओघवत्या वाणीतून छत्रपतींचा तेजस्वी इतिहास सांगत होते.तो युवा संन्यासी म्हणजे मातृभूमीचे उत्कट भक्त, निष्ठेचे सुधारणावादी आणि सातासमुद्रापार जाऊन विदेशांमध्ये भारतीय संस्कृतीची विजयपताका फडकविणारा योद्धा तसेच आत्मविस्मृत भारतीयांची अस्मिता जागविणारे स्वामी विवेकानंद होत. ही घटना आहे र्शी भट्टाचार्यंजींच्या घरातली आणि तो शिष्य म्हणजे डॉ. एम. सी. नंजुंद्र राव होत. त्यांनी नंतर त्यावेळच्या 'वेदांत केसरी'त ही घटना लिहिली. 

गुरुवार, १७ जानेवारी, २०१३

मराठी पावूल पडती पुढी


मराठी सिनेमाला लोकाश्रय नसल्याची चर्चा होतअसतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या 'बीपी तथा बालक पालक या सिनेमाने दहादिवसांतच तब्बल तीन कोटींचा पल्ला पार केला आहेअजूनही या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळतोय .प्रेक्षकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन अनेक थिएटर्स ,मल्टिप्लेक्सवाल्यांनी बीपी च्या शोजची संख्याहीवाढवली आहे आत्तापर्यंत सर्वाधिक कलेक्शनकरणाऱ्या शिवाजीराजे ...' ला बीपी बॉक्सऑफिसवरकशी टक्कर देतोय याची उत्सुकता प्रेक्षकांना लागूनराहिली आहे 


     पौगंडावस्थेत असलेल्या मुलांची गोष्ट सांगणारा बीपी हा सिनेमा ४ जानेवारीला प्रदर्शित झाला .प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाची खूप चर्चा होती त्यामुळे रिलीजनंतरही बीपी ला रसिकांचा तुफानप्रतिसाद मिळू लागला एक दोन आठवड्यातच थिएटर्समधून गाशा गुंडाळणारे मराठी सिनेमेपहायला मिळत असतानाच अनेक थिएटर्समध्ये या सिनेमाने हाऊसफुल्लचा बोर्ड लावला आहे दहादिवस होऊनही याला मिळणारा प्रतिसाद वाढतोच आहे या सिनेमाने दहा दिवसांतच तीन कोटी पारकेले आहेत याबाबत बोलताना सिनेमाचा निर्माता उत्तुंग ठाकूर म्हणाला , ' सिनेमाला मिळालेलाप्रतिसाद अप्रतिम आहे विषय आणि त्याची मांडणी यांचंच ते यश आहे म्हणूनच हा सिनेमाप्रदर्शित करताना आम्ही आधी १६० थिएटर्समध्ये ३५० शो लावले होते पण याला मिळणाराप्रतिसाद लक्षात घेऊन ही संख्या ४०० वर गेली आहे याचा फायदा बॉक्स ऑफिसवर झाला असून ,सिनेमाने आजवर तीन कोटी कमावले आहेत .' 

सिनेमा बनवतानाच त्याचं बजेट कमी असावं याकडे आम्ही लक्ष दिलं होतं कारण सिनेमाच्यातिकिटबारीची शाश्वती नव्हती म्हणूनच केवळ दीड कोटीत आम्ही पूर्ण सिनेमा बनवला ,' अशीमाहितीही त्याने दिली तीन कोटी पार करणारा नव्या वर्षातला हा पहिलाच सिनेमा ठरला आहे 

"राजे"

स्वतःच्या नावामागे "राजे"
लावणांऱ्‍यानोऐका जरा...
"100 दिवस खोटे राजे 
बनुन जगण्यापेक्षा...
1 दिवस खरे 
मावळे बनुन जगा 
इतिहासात तुमचे 
पण नाव होईल...

कट्टर मराठी

विशाल सागरालाही पायबंध
घातला त्यानं बांधुन सिंधुदुर्गे . नजर
त्याची गरुडापरी पडली सिद्दीच्या जंजिरावरी ,
केली त्यानं नऊवेळास्वारी तरीहीपडलं
अपयश पदरी , असेल का दुःख
या परी म्हणुन
थांबला नाही तो झुकला नाही तोपेटुन
उठला तो मर्द मराठा भिडला तो थेट
मुघलांना , दिलं त्यानं आव्हान डच,
पोर्तुगिजांना घेतलं अंगावर त्यानं
ब्रिटिशांना ,
शेवटी मराठ्यांचा राजा तो पुरून
उराला सगळ्यांना….
जय जिजाउ....!! जय शिवराय....!!  जय शभुंराजे....!!

मराठी पावूल पडती पुढे

मराठी रंगभूमीवर गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ सातत्यानं विविधरंगी भूमिकांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे हरहुन्नरी अभिनेता प्रशांत दामले आज त्यांच्या नाट्यकारकिर्दीतला 10 हजार 700 वा नाट्यप्रयोग सादर करणार आहेत.

मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात "गेला माधव कुणीकडे" या नाटकाच्या आजच्या प्रयोगादरम्यान हा विक्रम होईल. "सर्वाधिक प्रयोग केलेला जगातला एकमेव रंगकर्मी' असा विक्रम त्यांच्या नावावर होणार असून, तो "गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदला जाणार आहे.

मराठीअड्डा परिवारातर्फे प्रशांत दामले यांना या नाट्यविक्रमाकरिता हार्दिक शुभेच्या आणि मनापासून अभिनंदन...!

राज्याभिषेक दिन ! १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले!

छत्रपती संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन ! १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले!

संभाजी राजांच्या प्रधान मंडळाची रचना पुढील प्रमाणे होती:

सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती - संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश - सर्वोच्च अधिकार असलेले )
श्री सखी राज्ञी जयति - छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)

सरसेनापती - हंबीरराव मोहिते
कुलएख्तीयार (सर्वोच्च प्रधान) - कवी कलश
पेशवे - निळो मोरेश्वर पिंगळे
मुख्य न्यायाधीश - प्रल्हाद निराजी
दानाध्यक्ष - मोरेश्वर पंडितराव
चिटणीस - बाळाजी आवजी
सुरनीस - आबाजी सोनदेव
डबीर - जनार्दनपंत
मुजुमदार - अण्णाजी दत्तो
वाकेनवीस - दत्ताजीपंत

छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा पुढीलप्रमाणे होती...

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

शिवराज्याभिषेकानंतर त्यांनी अनेक मोहिमांवर नेतृत्व केले. पण खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच संभाजीमहाराज लोकांना कळाले. छत्रपतींचा वारसदार हा तेवढाच कार्यकुशल व पराक्रमी आहे हे त्यांनी प्रत्येक बाबतीत सिद्ध केले. मोगल, इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्दी या शत्रुंना नामोहरम करीत पुढील केवळ आठच वर्षांत शिवरायांनी उभारलेले स्वराज्य शंभूराजांनी दुप्पट केले......खजिना तिपटीपेक्षा अधिक वाढविला आणि सैन्य दुपटीपेक्षा अधिक वाढविले..

कविराजकुशल, राजकार्यधुरंधर हा सिंहाचा छावा,
पिढ्यापिढ्यांना देत प्रेरणा घेई येथे विसावा.

अश्या या महापराक्रमी , शूरवीर योध्यास
मानाचा मुजरा !!

बुधवार, ९ जानेवारी, २०१३

आग्र्याचा किल्ल्या

आग्र्याच्या किल्ल्यात कोणाची मर्दुमकी प्रकट झाली असेल तर ती श्री शिवछत्रपति महाराजांची. धन्य त्यांची की मोगल साम्राज्य वैभवाच्या कळसावर व सामर्थ्याच्या शिखरावर असताना आणि स्वतः एकाकी असताना त्यांनी शहेनशहाचा जाहीर निषेध केला. धन्य त्यांची की हे वैभव पाहून स्वदेशी परत आल्यावर त्यांनी मोगलांचे अनुकरण करून रंगमहल उठवले नाहीत, तर त्यांच्या प्रतिकारासाठी, त्यांच्याच मूलखातून गोळा केलेल्या लूटी मधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साध -नेसाठी जागोजागी दुर्गम दुर्ग उभारले."

राजा शिवछत्रपती आणि आई भवानीच्या आशीर्वादाने…

मर्द लोकांची व्याख्या आपण नेहमीवाघाशीच का करतो..??
कारण वाघ हा स्वबळावर शिकार करतो…
त्या केलेल्या शिकारी वर काही जनावरे आपली भूक भागवतात
त्याबद्दल वाघकधीच गर्व बाळगत नाही…
त्यापुढे कितीही मोठा जनावर आला तर
तो त्याचाशी न घाबरता संघर्ष करतो….
म्हणून
मित्रांनो एक व्याख्या तयार झालीआहे
“जगावे वाघासारखे तर लढावे शूरवीर
शिवबांसारखे”
पण मी तर म्हणतो..
“जगावे शिवबांसारखे अन
लढावेसुधा शूरवीर
शिवबांसारखेच कारण वाघालासुधा किमंत
माझ्या राजामुळेच आली आहे…!!”
आई भवानी दे वरदान
अखंड राहो हिंदुस्तान..

जय जिजाऊ जय शिवराय..!!


वाकडा जाणाऱ्याचा तुकडा पाडणारी माणसं आम्ही लढण्याचा मोह आवरत नाही जर औकातीवर उतरलो तर मग पुढे कोणीही टिकाव धरत नाही थाटला आम्ही अवघ्या महाराष्ट्राचा संसार घेऊन पदरी माँ साहेब जिजाऊंचे संस्कार ...आम्हीच लाविले भगवे झेंडे अटकेपार तळपली शिवछत्रपतिंची भवानि तलवारया मातिची तहान आम्ही रक्ताने भागविली गुलामगीरीच्या काळजात ज्योत स्वातंत्र्याची जागविली पेटविली रणांगने देह झिजविला मातिसाठी मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी
जय जिजाऊ
जय शिवराय..!!

भगवा फडकवला
ज्याने मातीत भगवा फडकवला.
त्याच्या हातून हिँदवी स्वराज्यनिर्मिला.
ओठांवर त्याच नाव येताच रक्त लागते
सळसळायला.
तोड नव्हती शिवबाला .
त्याचा नावाने सारा महाराष्ट्र गरजला.
जय शिवराय ,,जय शिवराय .

काळजाने वाघ, डोळ्यात आग,छातीत पोलाद

काळजाने वाघ, डोळ्यात आग,छातीत पोलाद, ही मराठ्याची औलाद,ताकद हत्तीची, चपळाई चित्त्याची,भगवे रक्त, शरीराने सक्त, झुकते इथेच दिल्लीचे तख्त, अन् झुकवू शकतात मराठेच फक्त...

जय शिवराय...!जय शंभुराजे.. .!

1. जगातील पहिले बुलेट पृफ जॉकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा
2. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा
3. जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात ८०० मीटर सेतू बांधणारा
4. आदिलशाही ,कुतुबशाही एकजूट करणारा आणि त्याच वेळी सिद्धी ,पोर्तुगीज व इंग्रजाना त्यांच्या बिळातकोंडून ठेवणारा त्याच वेळी मोघलानचा गर्दनकाळ ठरलेला
5. दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन करणारा . 6. उत्तर प्रदेशपासून दूर तामिळनाडूकर्नाट क आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा
7. इतर धर्मांचा मान सन्मान करणारा आणि धर्मातरावर कायदेशीर बंदी घालणारा
8. बालमजुरी व बेट बिगरि विरुद्ध कायदा करणारा
9. शिवप्रभुंची इच्छा पूर्णकरण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर पंधरा दिवसात दूर मध्य प्रदेशातील बुर्हाणपूरवर छापा घालणारा
10. स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा
11. देहू ते पंढरपूर आषाढीला संरक्षण व अर्थ पुरवठा करणारा
12. दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पिक कर्ज योजना राबविणारा
13. सैनिकांच्या उत्पनाला इतर मार्गाने हातभार लागावा म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा
14. आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातून तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा
15. स्वत:चे आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र देणारा
आपला शंभू राजा........... ....
काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा...
जय जिजाऊ...!
जय शिवराय...!जय शंभुराजे.. .!