सोमवार, १७ सप्टेंबर, २०१२

अभिमान आहे मला मराठी असण्याचा...

मराठी भाषेची एक परंपरा आहे आणि या परंपरेने आपल्याला बरेच काही दिलेले आहे, सर्वगुणसंपन्न केले आहे. या मातीचे, या मातीतील माणसांचे ऋण आपण कोणत्याही जन्मात फेडू शकत नाही. पण एक काम मात्र करू शकतो, त्यांचा हा वसा जोपासण्याचे, त्याला पुढे नेण्याचे.
अभिमान आहे मला मराठी असल्याचा.. गर्व म्हणालात तरी चालेल.. का असू नये मला माझ्या भाषेचा अभिमान.. ज्या भाषेमुळे मी लिहायला, वाचायला शिकलो, घडलो, रूजलो, फुललो, बहरलो, मुरलो त्याचा अभिमान मला असायलाच हवा.. त्याउपर माझ्या मराठीतील महान व्यक्तींनी केलेले कार्य, त्यांचे विचार, दृष्टीकोन, संस्कार हे सारे संचित पाहिले तर आपण कुणापेक्षाही कमी नाही, उलटपक्षी वरचढ आहोत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. गुलामगिरी झुगारून स्वतंत्र होण्याची संकल्पना मांडली ती छत्रपती शिवाजी महाराजांनीच ना, हिंदवी स्वराज्य स्थापन करायचा त्यांनी फक्त विचारच केला नाही तर ते आपल्याला करून दाखवलेही त्यांचे गोडवे, पोवाडे गाऊ तितकेच कमी आहे. त्यांना लाभलेले मराठी मावळेही तितकेच महान. कारण एका माणसासाठी सारे काही झुगारून देण्याची वृत्ती त्यांनी दाखवली आणि महाराष्ट्राला गुलामगिरीतून मुक्त केले.
महाराष्ट्राला संतांचीही मोठी परंपरा आहे, त्यांनी लिहिलेली प्रत्येक ओळ आजही आपल्या मनाला स्पर्शून जाणारी आणि विचार करायला लावणारी. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव, बहिणाबाई ते गाडगेबाबांपर्यंत. त्यांचे विचार हे आजही आपल्याला स्फुर्ती देणारे, चिरतरुण असेच. काळ कोणताही असो, त्यांचा प्रत्येक शब्द आजही आपल्यासाठी लागू पडतो.
भारताची राज्यघटना ज्यांनी लिहिली ते बाबासाहेब आंबेडकर हे मराठीच ना, त्यांनी राज्याला नाही, तर देशाला दिशा दिली. मग सांगा, मराठी माणूस संकुचित वृत्तीचा कसा काय असू शकतो. ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांच्यामुळे तर आपण शिक्षण घेऊ शकतोय. टिळक, आगरकर, सावरकर या आणि यांच्यासारख्या अनेक महान मराठमोळ्या व्यक्तींमुळेच तर आपण स्वतंत्र उपभोगू शकतोय. पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला तो मराठमोळ्या आनंदीबाई जोशी यांनीच ना.
आज जे बॉलीवूड नावाने प्रसिद्ध आहे त्याची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळक्यांनीच रोवली. दुर्गाबाई खोटेंपासून ते नाना पाटेकर पर्यंत आजही मराठी माणसाने आपला ठसा चित्रपटसृष्टीतही उमटवलेला आहे आणि ही पावले आता हॉलीवूडच्या दिशेने निघालेली आहेत. ‘श्यामची आई’, ‘श्वास’ ऑस्करवारी करुन आले आहेत. ‘जोगवा’ सारखा मराठी सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारांची लयलूट केली आहे. बिग बी अमिताभ बच्चनलाही ‘विहीर’ सारखा मराठी सिनेमा काढावासा वाटतो. आपला पहिला‘मिफ्टा’ ही दुबईत झाला, अजून काय हवंय.

रविवार, १६ सप्टेंबर, २०१२

शिवरायांचा त्रिवार जयजयकार…

मरणाला घाबरणारे आम्ही नाही
नेहमी मरणच घाबरल हिम्मतीला मराठ्यांच्या
साक्ष आहे त्या सह्याद्रीच्या कड्यांची
जिथे घोट घेतला मराठ्यांनी शत्रूंच्या नरडीचा
संतांनी आमच्यावर संस्कार केले
शिवाजी राजांनी आम्हाला हिम्मत दिली
शंभूराजांनी शिकवला स्वाभिमान मराठ्याचा
जिजावूंनी पाजले बाळकडू वीरपुत्र घडवण्याचे
जीवावर उदार झाले मावळे मराठी मातीसाठी
रक्ताचा अभिषेक केला राजांनी स्वराज्यासाठी
शूरांचा इतिहास आमचा उगाच बडाया मारत नाही
मराठी आम्हीरक्तच मराठी मराठीशिवाय जात लावत नाही
वेळ आला तर प्राण देवू पण स्वाभिमान आमचा झुकत नाही
सह्याद्रीपुत्र आम्ही उगाच कुणाच्या वाटेला जात नाही
आलाच जर कोणी आडवा उभा चीरल्याशिवाय सोडत नाही

काही मजेशीर व्याख्या

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो
शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा
वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
फॅशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका
पासबुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव
गॅलरी - मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन
छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन
परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'
परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ
दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन
थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव
नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
मन - नेहमी चोरीस जाणारी वस्तू
ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग
विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी
विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
श्रीमंत नवरा - चालतं बोलतं ATM कार्ड
श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी
IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन
चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर
लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना 

रविवार, २ सप्टेंबर, २०१२

धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे!


सुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाही
पुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी मोगलाई
निघाली एक फ़ोज मोठी विजापुरी
महराज होते त्यावेळी कोल्हापुरी
वेढा घातला होता पन्हाळ्यास सिद्दीने
४० हजारी फ़ोज लढत होती जिद्दीने
उन पावसाची न करता तमा फ़ोज लढली महिने चार
वेढा असाकी अवघड होते लहान ही मुंगीस करणे पार
करुन संपले प्रयत्न मरठ्याचे पन्हाळगडाबाहेरील सारे
फ़िरले होते महाराजांचे नशिब, उलटे वाहत होते वारे
रात्री एक शोधुनि बिकट वाट गडावर आला हेर महादेव
गडावरी पाहुन त्यास भरीला सर्वामध्ये नवा चेव
पाहत होते वाट राजगडी सर्वासह मॉ साहेब जीजाई
गाजवण्या शोर्य आले पुढे बाजी प्रभु आणी शिवा नाई.
राजे निसटले पोहचली सिद्दीच्या गोटात बात
जणु काही अदिलशाहीवर झाला प्रचंड वज्रघात
अंगकाठी रुपरचना होती शिवा न्हाव्याची महाराजा सारखी
करुनी राजांचा पोषाख भुलवण्यास गनीम तयार दुसरी पालखी
शिवा काशिदास दिसत होते समोर आहे मरण
पण गेला तो शिवाजीराजे बनुन सिद्दीस शरण
प्रगटता रुप खरे शिवा काशिदचे, किचाळुन तलवार फ़ाजिलखान खुपसवितो
मरताना शिवा काशिद बोलतो "सोंगाचा मी शिवाजी म्हणुन काय पालथा पडतो"
समोर दिसत होते सिद्दीरुपी शिवा काशिदास अंत
स्वराज्यासाठी केली नाही स्वामीनिष्ठानी जिवाची खंत
गजापुरच्या घोड खिंडीत बाजी प्रभुनी घडवला एक इतिहास
पण विसरु नका तुम्हीही शिवा काशिदचा स्वराज्याचा ध्यास

प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता