गुरुवार, १७ जानेवारी, २०१३

राज्याभिषेक दिन ! १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले!

छत्रपती संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन ! १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले!

संभाजी राजांच्या प्रधान मंडळाची रचना पुढील प्रमाणे होती:

सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती - संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश - सर्वोच्च अधिकार असलेले )
श्री सखी राज्ञी जयति - छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)

सरसेनापती - हंबीरराव मोहिते
कुलएख्तीयार (सर्वोच्च प्रधान) - कवी कलश
पेशवे - निळो मोरेश्वर पिंगळे
मुख्य न्यायाधीश - प्रल्हाद निराजी
दानाध्यक्ष - मोरेश्वर पंडितराव
चिटणीस - बाळाजी आवजी
सुरनीस - आबाजी सोनदेव
डबीर - जनार्दनपंत
मुजुमदार - अण्णाजी दत्तो
वाकेनवीस - दत्ताजीपंत

छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा पुढीलप्रमाणे होती...

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

शिवराज्याभिषेकानंतर त्यांनी अनेक मोहिमांवर नेतृत्व केले. पण खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच संभाजीमहाराज लोकांना कळाले. छत्रपतींचा वारसदार हा तेवढाच कार्यकुशल व पराक्रमी आहे हे त्यांनी प्रत्येक बाबतीत सिद्ध केले. मोगल, इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्दी या शत्रुंना नामोहरम करीत पुढील केवळ आठच वर्षांत शिवरायांनी उभारलेले स्वराज्य शंभूराजांनी दुप्पट केले......खजिना तिपटीपेक्षा अधिक वाढविला आणि सैन्य दुपटीपेक्षा अधिक वाढविले..

कविराजकुशल, राजकार्यधुरंधर हा सिंहाचा छावा,
पिढ्यापिढ्यांना देत प्रेरणा घेई येथे विसावा.

अश्या या महापराक्रमी , शूरवीर योध्यास
मानाचा मुजरा !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा