गुरुवार, १७ जानेवारी, २०१३

मराठी पावूल पडती पुढे

मराठी रंगभूमीवर गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ सातत्यानं विविधरंगी भूमिकांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे हरहुन्नरी अभिनेता प्रशांत दामले आज त्यांच्या नाट्यकारकिर्दीतला 10 हजार 700 वा नाट्यप्रयोग सादर करणार आहेत.

मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात "गेला माधव कुणीकडे" या नाटकाच्या आजच्या प्रयोगादरम्यान हा विक्रम होईल. "सर्वाधिक प्रयोग केलेला जगातला एकमेव रंगकर्मी' असा विक्रम त्यांच्या नावावर होणार असून, तो "गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदला जाणार आहे.

मराठीअड्डा परिवारातर्फे प्रशांत दामले यांना या नाट्यविक्रमाकरिता हार्दिक शुभेच्या आणि मनापासून अभिनंदन...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा