बिनधास्त पेपर सोडवा!
मित्रांनो, शाळेच्या गणवेशातील हाफ पॅन्ट तुमच्या आयुष्यातून आता कायमची हद्दपार झाली आहे. आजपासून सुरू होत असलेल्या दहावीच्या परीक्षेबरोबर शालेय अभ्यासाचे एक पर्वही संपणार आहे. पुढच्या महाविद्यालयीन जीवनात तुम्हाला तुमचे शाळेचे हे दिवस नेहमी आठवत राहणार आहेत. दहावीचे गुण मात्र तुम्हाला अनेक ठिकाणी इतरांना सांगावे लागणार आहेत. चांगले गुण मिळविण्यासाठी तुम्ही वर्षभर झटून अभ्यास केला आहेच. आता गरज आहे आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याची. अगदी बिनधास्तपणे ही परीक्षा द्या आणि यशस्वी व्हा!
all the best frnds
उत्तर द्याहटवा