शुक्रवार, २९ मार्च, २०१३

'गुगल ब्राउजर'मध्ये भारतीय भाषा

' गुगल ' च्या सर्व सेवांना भारतात मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता कंपनीने गुरुवारी भारतीय ग्राहकांसाठी फीचर फोनमध्ये सहा भारतीय भाषांना सपोर्ट करणारी सिस्टीम लाँच केली.

या नव्या सिस्टिममुळे आता ' जी मेल ' आणि ' फोन ब्राउजर ' मध्ये बंगाली , गुजराती , कन्नड , मराठी , तमिळ आणि तेलगू या भारतीय भाषांमध्ये सेवा मिळविणे सहज शक्य होणार आहे. या सहा भाषांचा उपयोग करून एखाद्या ब्राउजरमध्ये अॅड्रेस टाकणे अथवा एखादी वेबसाइट शोधणे सहज शक्य होणार आहे.

' विविधतेत एकता अशी भारतीय संस्कृतीची ओळख आहे. भारतात प्रतिदिन शंभरहून अधिक भाषा आणि त्याहून अधिक शब्दांचा व्यावहारिक वापर केला जातो. भारतीय ग्राहक प्रतिदिन स्मार्टफोन अथवा कम्प्युटरच्या माध्यमातून गुगलच्या सेवांचा वापर करतात. अत्याधुनिक उपकरणांवरील त्यांची मातृभाषेतील वापराची अडचण लक्षात

स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या देशात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. एकीकडे ही संख्या वाढत असली , तरी फोनवर मातृभाषेतून विविध व्यवहार करण्यावर मर्यादा पडतात. ते लक्षात घेता आम्ही मातृभाषांचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून ' गुगल ' च्या सेवा वापरण्याकडे ग्राहकांचा कल आणखी वाढेल , असा विश्वासही हिल यांनी व्यक्त केला.
घेता आम्ही बंगाली , गुजराती , कन्नड , मराठी , तमिळ आणि तेलगू भाषांचा वापर करता येईल , अशी सिस्टीम निर्मिली आहे. त्यामुळे त्यांना मातृभाषेतून संवाद साधणे सोपे जाईल ,' अशी माहिती ' गुगल लोकलायझेशन ' चे प्रोजेक्ट मॅनेजर इयान हिल यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा