शुक्रवार, १५ मार्च, २०१३

अखेर विजय झाला ! दिल्लीचे वाका-वाका; UPSCत पुन्हा मराठी टक्का!

यूपीएससीची परीक्षा केवळ हिंदी आणि इंग्रजीतूनच देता येईल, या वादग्रस्त निर्णयाला देशभरातून कडाडून विरोध झाल्याने अखेर हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. यामुळे आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मराठीमधून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय जनता पक्षासह देशभरातील अनेक प्रादेशिक पक्षांनी या निर्णयावर टीका केली. अखेर संसदेमध्ये हा प्रश्न ऐरणीवर आला. अखेर संसदीय कामकाज मंत्री नारायणसामी यांनी लोकसभेत सरकारने युपीएससीच्या निर्णयाला स्थगिती दिल्यासंदर्भात घोषणा केली.
सनदी अधिकारपदाची ही परीक्षा प्रादेशिक भाषांमधून देणा-यांची संख्या वाढत असताना यूपीएससीच्या या निर्णयाने असंख्य विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, असे सांगत भाजपचे प्रकाश जावडेकर, गोपिनाथ मुंडे, जनता दल (यु) चे शरद यादव, राष्ट्रीय जनता दलाचे लालू यादव, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनीही या निर्णयास विरोध केला होता. काही विशिष्ट लोकांनीच उच्च पदस्थ प्रशासकीय सेवेत यावे यासाठी हे कारस्थान रचल्याचा आरोपही करण्यात आला होता. एक उमेदवार जरी त्याच्या मातृभाषेत परीक्षा देणार असेल तर त्याला ती देता आली पाहिजे, अशी विरोधकांनी मागणी केली होती.

शिवसेनेचे उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनीही या निर्णयास विरोध केला होता

संसदेत समाजवादी पार्टी, जनता दल, अकाली दल, नॅशनल कॉन्फरन्स, अण्णा द्रमुक आणि द्रमुकच्या सदस्यांनीही गोंधळ घातला. ‘अंग्रेजी में काम ना होगा, फिर से देश गुलाम ना होगा’, ‘अंग्रेजी हटाओ, देश बचाओ’, ‘युपीएससी का गलत निर्णय, वापस लो.. वापस लो.. ‘ अशा घोषणा देत सभागृहात गोंधळ केला. News by prahaar

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा