'नटरंग', 'वळू', 'चांदनी बार', 'हे राम' सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाने राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारणा-या अतुल कुलकर्णी याला दक्षिणेतल्या मानाच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 'इडिग्रीके' (धैर्य) या कानडी चित्रपटातील भूमिकेसाठी अतुलला सर्वोत्त्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.
काल (शनिवार) संध्याकाळी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत हैदराबाद येथील इंटरनॅशनल कॉनव्हकेशन सेंटरमध्ये ६० वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी कानडी, तेलगू, तामीळ, मल्याळम सिनेमातील कलाकारांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. अतुलला सुमिर किट्टीर दिग्दर्शित आणि अग्नि श्रीधर यांच्या 'इडिग्रीके' (Edegarike) या कादंबरीवर आधारीत सिनेमातील अभिनयासाठी पुरस्कार देण्यात आला. 'इडिग्रीके' सिनेमामध्ये अतुलने खून्याची भूमिका साकारली आहे.