पीएसएलव्ही सी - २५ या उपग्रह प्रक्षेपकाने मंगळाकडे यशस्वी झेप घेतली. या उपग्रहाच्या निर्मितीत प्रदीप देवकुळे मराठी अभियंत्यांने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. उपग्रहाच्या संदेशवहनासाठीची जबाबदारी सांभाळल्याचा मनस्वी आनंद झाल्याचे प्रदीप देवकुळे यांनी ' मटा ' शी बोलताना सांगितले.
औरंगाबादेतील गर्व्हर्मेंट पॉलिटेक्निकमधून मॅकेनिकलची पदविका घेतलेले देवकुळे मूळचे भिंगार (जि. नगर) येथील आहेत. मॅकेनिकल इंजिनीअरिंग केल्यानंतर त्यांनी ग्राइंड मास्टरमध्ये तीन वर्षे नोकरी केली. २००८मध्ये ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्त्रो) रुजू झाले. भारताने आज पहिली मंगळ मोहीम राबविली. टेलिमॅट्रिक ट्रॅकिंग कंपाउंड (टीटीसी) अँटेना, पॅराबोलिक रिफ्लेक्टर सिस्टम यासह त्यांनी कम्युनिकेशन सिस्टम ग्रुपमध्ये सर्वात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
देवकु
ळे म्हणाले, ' इस्त्रोचे चेअरमन के. राधाकृष्णन यांचे हे स्वप्न होते. कारण आपण, चंद्रयान एक मोहीम यशस्वी केली. चंद्रयान - २ ची तयारी करण्यात आली आहे, पण मंगळ मोहिमेसाठी राधाकृष्णन यांनी स्वप्न पाहिले होते. अमेरिका, रशिया, युरोपीय देशांनंतर ही कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. ऑगस्ट २०१२मध्ये या प्रकल्पाला मान्यता मिळाली. वर्षभराहून कमी कालावधी उरलेला असताना आमच्या सर्वांवर मोठी जबाबदारी होती. माझ्याकडे उपग्रहाकडून आमच्याकडे येणारे संदेश, आमच्याकडून दिले जाणारे संदेश वहन करण्यासाठी लागणारे अँटेना, रिफ्लेक्टर याच्या निर्मितीत मी होतो. माझी पत्नी नंदिनी हिचे मला मोलाचे सहकार्य या मोहिमेदरम्यान लाभले. ''
कंम्प्युटरवर केलेले डिझाइन आणि थेरॉटिकल डिझाइन तपासून ते जुळविण्याचे अवघड काम देवकुळे यांच्याकडे होते. अँटेना आणि रिफ्लेक्टरसाठीचे अॅल्युमिनिअम प्रोटोटाइप त्यांनी बनविले. त्याची यशस्वी चाचणी मुंबईला गोदरेज कंपनीत करण्यात आली, असेही देवकुळे यांनी आवर्जून सांगितले.
प्रदीप माझ्याकडे डिप्लोमाला होता. तो मुळातच अतिशय हुशार, सदैव नवीन कल्पना, नावीन्यतेत रुळणारा हा विद्यार्थी होता. एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याची त्याची वृत्ती होते. मंगळ मोहिमेत त्याचा सहभाग आहे, याचा मनस्वी आनंद झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा