शुक्रवार, २९ मार्च, २०१३
'गुगल ब्राउजर'मध्ये भारतीय भाषा
' गुगल ' च्या सर्व सेवांना भारतात मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता कंपनीने गुरुवारी भारतीय ग्राहकांसाठी फीचर फोनमध्ये सहा भारतीय भाषांना सपोर्ट करणारी सिस्टीम लाँच केली.
या नव्या सिस्टिममुळे आता ' जी मेल ' आणि ' फोन ब्राउजर ' मध्ये बंगाली , गुजराती , कन्नड , मराठी , तमिळ आणि तेलगू या भारतीय भाषांमध्ये सेवा मिळविणे सहज शक्य होणार आहे. या सहा भाषांचा उपयोग करून एखाद्या ब्राउजरमध्ये अॅड्रेस टाकणे अथवा एखादी वेबसाइट शोधणे सहज शक्य होणार आहे.
' विविधतेत एकता अशी भारतीय संस्कृतीची ओळख आहे. भारतात प्रतिदिन शंभरहून अधिक भाषा आणि त्याहून अधिक शब्दांचा व्यावहारिक वापर केला जातो. भारतीय ग्राहक प्रतिदिन स्मार्टफोन अथवा कम्प्युटरच्या माध्यमातून गुगलच्या सेवांचा वापर करतात. अत्याधुनिक उपकरणांवरील त्यांची मातृभाषेतील वापराची अडचण लक्षात
स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या देशात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. एकीकडे ही संख्या वाढत असली , तरी फोनवर मातृभाषेतून विविध व्यवहार करण्यावर मर्यादा पडतात. ते लक्षात घेता आम्ही मातृभाषांचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून ' गुगल ' च्या सेवा वापरण्याकडे ग्राहकांचा कल आणखी वाढेल , असा विश्वासही हिल यांनी व्यक्त केला.
घेता आम्ही बंगाली , गुजराती , कन्नड , मराठी , तमिळ आणि तेलगू भाषांचा वापर करता येईल , अशी सिस्टीम निर्मिली आहे. त्यामुळे त्यांना मातृभाषेतून संवाद साधणे सोपे जाईल ,' अशी माहिती ' गुगल लोकलायझेशन ' चे प्रोजेक्ट मॅनेजर इयान हिल यांनी दिली. या नव्या सिस्टिममुळे आता ' जी मेल ' आणि ' फोन ब्राउजर ' मध्ये बंगाली , गुजराती , कन्नड , मराठी , तमिळ आणि तेलगू या भारतीय भाषांमध्ये सेवा मिळविणे सहज शक्य होणार आहे. या सहा भाषांचा उपयोग करून एखाद्या ब्राउजरमध्ये अॅड्रेस टाकणे अथवा एखादी वेबसाइट शोधणे सहज शक्य होणार आहे.
' विविधतेत एकता अशी भारतीय संस्कृतीची ओळख आहे. भारतात प्रतिदिन शंभरहून अधिक भाषा आणि त्याहून अधिक शब्दांचा व्यावहारिक वापर केला जातो. भारतीय ग्राहक प्रतिदिन स्मार्टफोन अथवा कम्प्युटरच्या माध्यमातून गुगलच्या सेवांचा वापर करतात. अत्याधुनिक उपकरणांवरील त्यांची मातृभाषेतील वापराची अडचण लक्षात
स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या देशात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. एकीकडे ही संख्या वाढत असली , तरी फोनवर मातृभाषेतून विविध व्यवहार करण्यावर मर्यादा पडतात. ते लक्षात घेता आम्ही मातृभाषांचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून ' गुगल ' च्या सेवा वापरण्याकडे ग्राहकांचा कल आणखी वाढेल , असा विश्वासही हिल यांनी व्यक्त केला.
रविवार, १७ मार्च, २०१३
मराठी माणसांचा ' आनंदसोहळा
अमेरिकेतल्या मराठी माणसांचा ' आनंदसोहळा '
म्हणून ओळखल्या जाणारे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन यंदा ५ ते ७ जुलै
२०१३ दरम्यान प्रोव्हिडन्स येथे होणार आहे. या अधिवेशनाची तयारी सध्या
जोरात सुरू असून , सुप्रसिद्ध विज्ञान लेखक बाळ फोंडके , सिनेदिग्दर्शक आशुतोष गोवारीकर , अभिनेते प्रशांत दामले , क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आदी मान्यवार ही मैफल सजवणार आहेत.
सुप्रसिध्द सिने-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे असतील. प्रसिध्द विज्ञानलेखक तसंच विज्ञान-प्रचारक डॉ. बाळ फोंडके यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
मराठी रंगभूमीवरचा ' विक्रमवीर ' प्रशांत दामले यावेळी जरा वेगळ्या रुपात रंगमंचावर अवतरणार आहे. या गायक-अभिनेत्याचं व्यक्तिमत्व कसं आहे , ते खुल्या गप्पांमधून रसिकांसमोर येणार आहे. त्याचबरोबर , भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर हेही मुलाखतीद्वारे रसिकांना सामोरे जाणार असून , सुप्रसिध्द स्तंभलेखक द्वारकानाथ संझगिरी त्यांची मुलाखत घेतील.
बी.एम.एम.च्या अधिवेशनात कोणतं नाटक येतं , याकडे अमेरिकेतील नाटकप्रेमी नजर लावून असतात. यावेळी सुकन्या कुलकर्णी , अजित भुरे , अद्वैत दादरकर आदींच्या भूमिका असलेलं , ' एकदंत क्रिएशन्स ' निर्मित आणि विजत केंकरे दिग्दर्शित ' फॅमिली ड्रामा ' रसिकांच्या भेटीला येत आहे.
त्याबरोबर , यावर्षी रसिकांना संगीत-नाटकाचीही मेजवानी मिळणार आहे. राहुल देशपांडे यांनी पुनरुज्जीवित केलेलं ' संगीत मानापमान ' यावेळी सादर होणार आहे. तसेच या अधिवेशनात कवी सौमित्र आणि वैभव जोशी यांची काव्यमैफलही होईल.
बी.एम.एम. सारेगम २०१३ या संगीतस्पर्धेच्या अंतिम फेरीचा सोहळा या अधिवेशनात होणार आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्रिया बापट करणार असून , प्रशांत दामले हेही या सोहळ्यात ' विशेष अतिथी ' म्हणून सहभागी होतील.
या अधिवेशनाविषयी अधिक माहितीसाठी क्लिक करा
www.bmm2013.org
www.facebook.com/bmm2013

शनिवार, १६ मार्च, २०१३
शुक्रवार, १५ मार्च, २०१३
अखेर विजय झाला ! दिल्लीचे वाका-वाका; UPSCत पुन्हा मराठी टक्का!
यूपीएससीची परीक्षा केवळ हिंदी आणि इंग्रजीतूनच देता येईल, या वादग्रस्त निर्णयाला देशभरातून कडाडून विरोध झाल्याने अखेर हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. यामुळे आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मराठीमधून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय जनता पक्षासह देशभरातील अनेक प्रादेशिक पक्षांनी या निर्णयावर टीका केली. अखेर संसदेमध्ये हा प्रश्न ऐरणीवर आला. अखेर संसदीय कामकाज मंत्री नारायणसामी यांनी लोकसभेत सरकारने युपीएससीच्या निर्णयाला स्थगिती दिल्यासंदर्भात घोषणा केली.
सनदी अधिकारपदाची ही परीक्षा प्रादेशिक भाषांमधून देणा-यांची संख्या वाढत असताना यूपीएससीच्या या निर्णयाने असंख्य विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, असे सांगत भाजपचे प्रकाश जावडेकर, गोपिनाथ मुंडे, जनता दल (यु) चे शरद यादव, राष्ट्रीय जनता दलाचे लालू यादव, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनीही या निर्णयास विरोध केला होता. काही विशिष्ट लोकांनीच उच्च पदस्थ प्रशासकीय सेवेत यावे यासाठी हे कारस्थान रचल्याचा आरोपही करण्यात आला होता. एक उमेदवार जरी त्याच्या मातृभाषेत परीक्षा देणार असेल तर त्याला ती देता आली पाहिजे, अशी विरोधकांनी मागणी केली होती.
शिवसेनेचे उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनीही या निर्णयास विरोध केला होता |
संसदेत समाजवादी पार्टी, जनता दल, अकाली दल, नॅशनल कॉन्फरन्स, अण्णा द्रमुक आणि द्रमुकच्या सदस्यांनीही गोंधळ घातला. ‘अंग्रेजी में काम ना होगा, फिर से देश गुलाम ना होगा’, ‘अंग्रेजी हटाओ, देश बचाओ’, ‘युपीएससी का गलत निर्णय, वापस लो.. वापस लो.. ‘ अशा घोषणा देत सभागृहात गोंधळ केला. News by prahaar
शनिवार, २ मार्च, २०१३
बिनधास्त पेपर सोडवा!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)